शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

संतप्त शेतकऱ्यांनी रोखले मखमलाबादला सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:51 AM

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीने महासभेवर प्रस्ताव केला आणि शेतकºयांच्या लाभही परस्पर निश्चित केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तातडीने मखमलाबाद येथील काम बंद पाडलेच, शिवाय येथे आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना कंपनीच्या दुटप्पीपणाचा जाब विचारला. याप्रकारानंतर कंपनीने सर्वेक्षण थांबवले असून, शेतकºयांनीदेखील धाव घेत भाजपाच्या पार्टी मिटिंगमध्ये हा सर्व प्रकार कथन केला. त्यामुळे शनिवारी (दि.१९) होणाºया महासभेत हा प्रस्ताव स्थगित ठेवू, असे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी संबंधितांना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘ग्रीन फिल्ड’चा प्रश्न : संमतीआधी महासभेत प्रस्ताव मांडल्याने आक्षेप

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीने महासभेवर प्रस्ताव केला आणि शेतकºयांच्या लाभही परस्पर निश्चित केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तातडीने मखमलाबाद येथील काम बंद पाडलेच, शिवाय येथे आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना कंपनीच्या दुटप्पीपणाचा जाब विचारला.याप्रकारानंतर कंपनीने सर्वेक्षण थांबवले असून, शेतकºयांनीदेखील धाव घेत भाजपाच्या पार्टी मिटिंगमध्ये हा सर्व प्रकार कथन केला. त्यामुळे शनिवारी (दि.१९) होणाºया महासभेत हा प्रस्ताव स्थगित ठेवू, असे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी संबंधितांना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखलबाद- नाशिक शिवारात एकूण सातशे एकरमध्ये नियोजनबद्ध स्मार्टनगर वसविण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविली जाणार आहे. या प्रस्तावला मुळातच परिसरातील शेतकºयांचा विरोध आहे. तथापि, गेल्या महिन्यात कंपनीने यासंदर्भातील सादरीकरण शेतकºयांना केले आणि सर्वेक्षण करू देण्याची विनंती केली होती. त्यावेळी शेतकºयांनी काय लाभ होणार, असे विचारले असता आधी सर्वेक्षण झाले की मग त्याचे गणित मांडता येईल, असे सांगितले होते. शेतकºयांनी प्रकल्पाला विरोध ठेवूनही अखेरीस सर्वेक्षणाला संमती दिली होती. त्यानुसार एका खासगी एजन्सीमार्फत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सर्वेक्षणदेखील सुरू करण्यात आले होते. मात्र असे असताना स्मार्ट सिटी कंपनीने शनिवारी (दि.१९) होणाºया महासभेत हरित क्षेत्र विकासाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात महापालिकेने इरादा जाहीर करावा एवढाच उल्लेख असला तरी त्यानंतर हा इरादा राजपत्रात प्रसिद्ध करण्याचीदेखील तरतूद आहे. त्यामुळे प्रस्ताव संमत झाल्यासारखेच होणार आहे. याशिवाय प्रस्तावात टीपी स्कीममध्ये सर्व जमिनी एकत्र केल्यांनतर अंतिमत: शेतकºयांना ५० टक्के जागा देण्याचादेखील उल्लेख आहे. शुक्रवारी दुपारी काही शेतकºयांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला.आज महासभेत प्रस्तावमहापालिकेच्या शनिवारी (दि.१९) होणाºया महासभेत ‘ग्रीन फिल्ड’चा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावरून जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. सदरच्या प्रस्तावाला शेतकºयांचा विरोध असल्याने हा विषय शेतकºयांवर सोडण्याचा निर्णय अगोदरच शिवसेनेच्या पक्ष बैठकीत घेण्यात आला आहे. आता भाजपासह अन्य पक्षांकडून त्यास विरोध होण्याची शक्यता आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखलबाद-नाशिक शिवारात एकूण सातशे एकरमध्ये नियोजनबद्ध स्मार्टनगर वसविण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविली जाणार आहे. या प्रस्तावाला मुळातच परिसरातील शेतकºयांचा विरोध आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी