ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील डोंगराळ भागात साधे पीकही धड घेता येत नसताना तेथील शेतकरी बाळासाहेब कोंडाजी दाणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून डाळिंबाची बाग फुलविली आहे. दोन वर्षाच्या परिश्रमानंतर या शेतकऱ्याच्या हातात कष्टाचे फळ मिळाले आहे. या तरुण शेतकऱ्याने खडक व माळरान जेसीबीने सपाट करून व शेततळे तयार करून जमीन व पाण्याचे व्यवस्थापन केले. सव्वाचार एकर खडकाळ व मुरमाड जमिनीत भगवा हे डाळिंबाचे वन लावले. बाळासाहेब दाणे यांनी खडकाळ मातीत डाळींब शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यातच परंपरागत सेंद्रिय शेती व आधुनिक पाणी व्यवस्थापन यांचा मिलाप करून आदर्श निर्माण केला आहे. डाळींब उत्पादनासाठी वेळोवेळी कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर, डॉ. संजय देवरे यांच्यासह तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन सेंद्रिय शेतीचा अवलंब करीत डाळिंबाचे विक्रमी उत्पादन घेतले. वेळोवेळी घेतलेल्या परिश्रमामुळे कष्टाला यश
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून डाळिंबाची बाग फुलविली
By admin | Published: October 09, 2014 10:51 PM