मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांनी आपल्या तब्बल दोन एकर डाळिंबाच्या बागेवर कुºहाड चालवत बाग भुईसपाट केला आहे. या दोन एकर बागेत एकूण सातशे पन्नास डाळिंबाची झाडे होती.जमिनीतील भूजल पातळीत कमालीची घट होत गेल्याने बागेला पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या दोन डाळिंबाच्या बागेवर उघड्या डोळ्यादेखत कुºहाड चालविण्याची नामुष्की शेतकºयावर ओढावली असून, मोठ्या अपेक्षेने डाळिंबबाग पिकवून दर्जेदार उत्पादन घेण्याच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले आहे. ऐन दुष्काळात लाखो रु पयांचा खर्च आणि मेहनत वाया गेल्याची खंत शेतकरी राजेंद्र शेळके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनीची पाण्याविना धूप होऊ लागल्याने कडक उन्हामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही वेळी अचानक वातावरणात सातत्याने झालेल्या बदलाचादेखील परिणाम डाळिंबबाग, द्राक्षबाग, तसेच खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर झाल्याचे आढळून आले आहे. त्यात डिसेंबर महिन्यात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ येथील शेतकऱ्यांचे भवितव्य दुष्काळी स्थितीमुळे यंदा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून होते. परंतु पाणी वाटपाचे नियोजन न झाल्याने खडकीमाळ येथील वितरिका क्र मांक २५ ला पाणी न पोहोचल्याने पालखेड आवर्तनापासून शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे शेतातील विहीर, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली.कोट....दोन महिन्यापासून उष्णता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढल्याने डाळिंबबागेला पुरेसे पाणी मिळत नव्हते. तीन दिवसांपासून तापमानाने चाळिशी पार केल्याने डाळिंबबाग अचानक सुकू लागली. परिणामी मला माझ्या तीन एकर डाळिंबबागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली.- राजेंद्र शेळके, शेतकरी, मानोरी
पाण्याअभावी डाळिंबबागेवर कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 2:41 PM