दिंडोरी : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण सुरू झाल्याबद्दल दिंडोरी शहरासह तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोव्हिड १९ च्या पाशर््वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कार्यक्र मास बंदी असल्याने अनेक भाविकांनी घरी पूजा अर्चा करत आनंद साजरा केला. फटाके फोडत लाडू वाटप करण्यात आले. दिंडोरी येथील पुरातन श्रीराम मंदिरात पूजा महाआरती करण्यात आली.श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे मोठे औत्युस्क नागरिकांमध्ये होते. मंगळवार सायंकाळ पासून रामभक्तांमध्ये नवचैतन्य पसरले होते. ठिकठिकानी फ्लेक्स लावल्यात आले होते. मुख्य रस्त्यावर भगवे झेंडे लावण्यात आले. येथील श्री रामदास मठ येथील पुरातन श्रीराम मंदिरात फुलांची आरास करण्यात येऊन विशेष महापूजा करण्यात आली. दुपारी भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. पुजारी मिलिंद रामदासी यांनी पूजा व आरती केली. प्रभू रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय चा जयघोष करण्यात आला.श्रीराम मंदिर निर्माण संघर्षाला उजळणीश्रीराम मंदिर अयोध्येत व्हावे यासाठी अनेक वर्षे संघर्ष सुरू होता. यात दिंडोरी येथील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. विश्व हिंदू परिषदेने मंदिर निर्माणसाठी संपूर्ण देशभर जे आंदोलन पुकारात जपयज्ञ केला होता. त्यात ३ फेब्रुवारी २००२ साली दिंडोरी येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर जपयज्ञ समितीतर्फे दोन दिवसीय यज्ञ करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील ६३ कारसेवक अयोध्येला गेले होते. तत्पूर्वी तालुक्यातील घराघरात रामनाम जप करण्यात आला होता. या साऱ्या आठवणींना चंद्रकांत राजे, मिलिंद रामदासी, मुकुंद रामदासी, दत्तात्रय नाईकवाडे, रणजित देशमुख यांनी उजाळा दिला . उपस्थित भाविकांनी मंदिर निर्माण प्रारंभ होऊन स्वप्नपूर्ती होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत लाडू, पेढ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, तुषार वाघमारे, राजसिंग पुरोहित, शिवाजी कर्पे, संतोष मुरकुटे, चंदू मिस्तरी, रवी जाधव, पंकज देशमुख, विलास देशमुख, संतोष तमखाने आदींसह भाविक उपस्थित होते. बस स्टँड जवळील श्रीराम मंदिरातही पूजा करत महाआरती करण्यात आली.(फोटो ०५ दिंडोरी)दिंडोरी येथील रामदास स्वामी मठातील पुरातन श्रीराम मंदिरात आरती करताना पुजारी मिलिंद रामदासी दुसर्या छायाचित्रात आरतीसाठी उपस्थित भाविक.
दिंडोरीत पुरातन श्रीराम मंदिरात पूजा महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 3:44 PM