धुळगाव : धुळगाव ते एरंडगाव फाटा या चार साडेचार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खराब रस्त्यांमुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, विकासाला खीळ बसली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी चार ते पाच फूट रुंदीचे खड्डे निर्माण झाल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याने पायी प्रवास करणेदेखील अवघड झाले आहे. परिसरातील शेतकरी याच मार्गाने आपला शेतमाल विक्रीस नेण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. खराब रस्त्यामुळे शेतमाल वाहतुकीला अडथळे येतात.गेल्या दोन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. खड्ड्यांमध्ये आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात नेहमीच लहान-मोठे अपघात होत आहेत.
धुळगाव-एरंडगाव फाटा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:41 PM
धुळगाव : धुळगाव ते एरंडगाव फाटा या चार साडेचार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खराब रस्त्यांमुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून, विकासाला खीळ बसली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी चार ते पाच फूट रुंदीचे खड्डे निर्माण झाल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.
ठळक मुद्देरस्त्यावर ठिकठिकाणी चार ते पाच फूट रुंदीचे खड्डे