लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे गाव तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य गाव मानले जाते. परंतु रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे येथील औद्योगिक क्षेत्राला एकप्रकारे ग्रहण लागले आहे.लखमापूर फाटा ते लखमापूर हा रस्ता औद्योगिक आणि दळणवळणाच्या माध्यमातून महत्त्वाचा मानला जातो. परंतु हा रस्ता सध्या अत्यंत खड्ड्यांनी व्यापला असून, वाहन कसे चालवावे, असा गहन प्रश्न होऊन बसला आहे.या रस्त्याने थेट गुजरात, सापुतारा, ननाशी व इतर बहुसंख्य खेड्या-पाड्यातील लोक दररोज ये-जा करीत असतात. या रस्त्यावर सध्या खड्ड्याचा अधिकार निर्माण झाल्याने वाहनधारकांला कोणता खड्डा टाळावा व कोणता नाही हेच समजत नाही. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, अनेकजण यामुळे जखमी झाले आहेत, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. काहींना तर आपला प्राण गमवावा लागला आहे. मागच्या एक आठवड्यापूर्वी राहुल भालेराव नामक युवकाला या रस्त्यातील खड्ड्यांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.या रस्त्याने अनेक राजकीय पुढारी दररोज तालुक्याला कामानिमित्ताने जातात. परंतु या रस्त्याकडे कोणीही पाहात नाही. मध्यंतरी खड्डे बुजाविण्याचे काम सुरू केले, परंतु खड्डा एका बाजूला व डांबर दुसरीकडे त्यामुळे खड्डे तसेच राहिले. त्याचा वाहनचालकांना आणखीनच त्रास होत आहे.सध्या कादवा सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने व बैलगाडीवाले जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. या रस्त्याचे काम संबंधित विभागाने लक्ष लवकर करावे, अशी मागणी सध्या प्रवासीवर्गातून केली जात आहे.१) लखमापूर ते लखमापूर फाटा हा रस्ता औद्योगिक क्षेत्राच्या दुष्टीने महत्त्वाचा मानला जातो.२) सापुतारा (गुजरात) जाण्यासाठी हा रस्ता बायपास रस्त्याला मिळण्यासाठी जवळचा मानला जातो.३) या रस्त्याला वाली कोण होणार ग्रामस्थांचा व प्रवासीवर्गाचा सवाल.
लखमापूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 6:00 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे गाव तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य गाव मानले जाते. परंतु रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे येथील औद्योगिक क्षेत्राला एकप्रकारे ग्रहण लागले आहे.
ठळक मुद्देवाहनधारक व प्रवासीवर्गाची डोकेदुखी वाढली