निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील गावाबाहेरच्या जाम नदीवरील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, त्वरित दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.जाम नदीच्या तीरावर ग्रामपंचायतीच्या वतीने दोन अमरधाम शेड बांधण्यात आले आहेत; पण येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. शेडच्या परिसरात घाणीसह मोठमोठे काँग्रेस गवत व काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात अग्नीडाग देणाऱ्याला अंघोळीसाठी पाणी उपलब्ध असून, त्याठिकाणी हौद किंवा टाकी बांधण्यात आलेली नाही. तसेच रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तर त्याठिकाणी विजेची सोय नसल्याने गैरसोय होत आहे. विद्युत खांब असूनही काही ठिकाणी पथदीप बसविण्यात आलेले नसून, काही ठिकाणी बंद अवस्थेत आहेत.ग्रामस्थांना बसण्यासाठी जागा नाही. अंत्यसंस्काराची जागाही अस्वच्छ आहे. सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. स्मशानभूमीची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
निऱ्हाळे फत्तेपूरच्या स्मशानभूमीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 5:50 PM
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील गावाबाहेरच्या जाम नदीवरील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, त्वरित दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्दे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.