लोकमत न्यूज नेटवर्कपांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पिंपरी अंचला ते अहिवंतवाडी रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले असून शासनाने तातडीने हा रस्ता दुरु स्त करण्याची मागणी ग्रामस्थ करित आहेत.गुजरात व पेठ वापीकडून सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सापुतारा बोरगाव, पिंपरी अंचला, अहिवंतवाडीमार्गे सप्तश्रृंगी मातेच्या गडावर जाणाऱ्या भाविकांना रस्ता खराब असल्यामुळे प्रवाशांना २५ किलोमीटरचा फेरा मारून सप्तशृंगी गडावर जावे लागते.पिंपरी अंचलामार्गे सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी भाविकांना जवळचा मार्ग असून या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून तो रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अशी मागणी वाहनचालक पिंटू चौधरी यांनी सांगीतले.तसेच या रस्त्याने दोन दिवसापुर्वी झालेल्या मोटरसायकलच्याअपघातात चालकास ग्रामस्थांनी दवाखान्यात घेवून जावे लागले. तसेच सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी पिंपरीअंचला मार्गे सात किलोमिटरचे अंतर पडते परंतू रस्ता खराब झाल्यामुळे २५ किलोमिटरच्या फेरा मारु न गडावर जावे लागत आहे.
पिंपरी अंचला ते अहिवंतवाडी रस्त्याची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 7:37 PM
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पिंपरी अंचला ते अहिवंतवाडी रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले असून शासनाने तातडीने हा रस्ता दुरु स्त करण्याची मागणी ग्रामस्थ करित आहेत.
ठळक मुद्देरस्ता खराब असल्यामुळे प्रवाशांना २५ किलोमीटरचा फेरा मारून सप्तशृंगी गडावर जावे लागते.