वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडसह परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन चिंचखेड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले.चिंचखेड ते पिंपळगाव रस्ता मसोबापर्यंत उर्वरित १२०० मीटर रस्त्यांचे काम होणेबाबत तसेच साकोरे रस्ता ते उंबरखेड शिव रस्ता मार्गे नवीन शरदचंद्र पवार मार्केट यार्ड पर्यंत या रस्त्याचे काम होणेबाबत, तसेच मारुती मंदिराच्या परिसरात सामाजिक व सांस्कृतिक सभागृह बांधकाम अशा विविध मागण्यांचे निवेदन चिंचखेड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या मार्फत विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांना देण्यात आले.चिंचखेड ते पिंपळगाव बसवंत म्हसोबा मंदिरापर्यंतच्या १२०० मीटर अंतराच्या रस्त्याची दूरवस्था झालेली असून या रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण व रुंदीकरण करणे अतिशय गरजेचे आहे. दोन्ही रस्त्याच्या कडेने पथदीप बसविणे दळणवळणाच्या दृष्टीने गरजेचे आहे. सदर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच प्रवाशांसाठी सुरू असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस बंद होण्याची वेळ आलेली आहे. चिंचखेड ते उंबरखेड येथील साकोरे ते उंबरखेड शिव रस्तामार्गे नवीन शरदचंद्रजी पवार मार्केटपर्यंतच्या पाच किलोमीटर अंतराचा हा रस्ता शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा आहे. मात्र त्याची दुर्दशा झाल्याने वाहतुकीस अडथळे येत आहेत. यासाठी सदर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी शेतकरी व विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. रस्त्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी झिरवाळ यांना निवेदन देण्यात आले.
चिंचखेड परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 8:55 PM
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडसह परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन चिंचखेड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले.
ठळक मुद्देग्रामपंचायत सदस्यांतर्फे झिरवाळ यांना निवेदन