कधी जोरदार तर कधी रिमझिम पावसाने रस्ते उखडत असून, त्यात मोठमोठे खड्डे पडत आहेत. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यांमुळे डबकी तयार होत आहेत. त्यात मच्छर वाढून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात एकही रस्ता चांगला नसून सर्वच रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याशिवाय केळी बागा देखील आहेत. अनेक पिकांची काढणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी काढलेला शेतमाल मालेगाव, चाळीसगाव मुंगसे, उमराणे बाजार समिती उपआवारात विकण्यासाठी याच रस्त्याने न्यावा लागतो. रस्त्यात मोठमोठे खड्डे असून, वाहनचालक शेतमाल बाजारात नेण्यासाठी नाखूष असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो, खासगी प्रवासी वाहनात बसलेल्या प्रवाशांची हाडे देखील मोकळी होतात. त्यामुळे अनेकांना मणक्यांचे विकार जडले आहेत. संबंंधितांनी रस्त्याची डागडुजी करून रस्ते दुरुस्त करावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहेे.
फोटो- २६ कळवाडी रोड
260921\26nsk_21_26092021_13.jpg
फोटो- २६ कळवाडी रोड