बाजारसमिती आवारात अस्वच्छता
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली असून, केरकचरा साचला आहे. यामुळे बाजारसमिती आवारात दुर्गंधी येते. या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. बाजार समिती प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष
नाशिक : रामकुंड परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून, यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाला आहे. लॉकडाऊननंतर बहुतेक व्यवहार सुरळीत झाले असले, तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
भाजीपाल्याची चढ्या दराने विक्री
नाशिक : किरकोळ विक्रेत्यंकडून भाजीपाला चढ्या भावाने विकला जात असल्याने, सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना मात्र भाजीपाल्याचा योग्य भाव मिळत नसल्याने, शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
साथीच्या आजारांमध्ये वाढ
नाशिक : विविध साथीच्या आजारांमुळे शहरातील विविध डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. रुग्णांनी वेळीच काळजी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.