पंचवटी : नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागातील सहाही प्रभागांची साफसफाई करण्याची जबाबदारी बोटावर मोजण्याइतकी म्हणजे केवळ ११० कर्मचाºयांवर असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. पंचवटीची लोकसंख्या जवळपास तीन लाखांवर पोहचली आहे आणि मनपा प्रशासनाकडे अद्याप पुरेसे मनुष्यबळ नसल्याने लोकसंख्येच्या मानाने सफाई कर्मचाºयांचे मनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आहे.तीन लाख लोकसंख्येचा विचार केला तर सरासरी दहा हजार माणसांमागे केवळ चार सफाई कर्मचारी असल्याचे सफाई कर्मचाºयांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पंचवटी प्रभागाच्या बैठकीत वारंवार सफाई कर्मचाºयांची अपुरी संख्या असल्याने सफाई कर्मचारी येत नाहीत, संपूर्ण प्रभागात केवळ एक, तर काही ठिकाणच्या प्रभागात सफाई कर्मचारीच नसल्याची ओरड नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या पंचवटी प्रभागाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी करून आरोग्य विभागाचा खरपूस समाचार घेतला होता. मनपा आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांची संख्या लक्षात घेतली तर चार सदस्य असलेल्या एका प्रभागात १८ कर्मचारी कार्यरत आहेत. यातही काही कर्मचारी गैरहजर असतात. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाºयांवर कामाचा वाढीव बोजा पडत आहे.पंचवटी विभागाची लोेकसंख्या तीन लाखांच्या पुढे असून, परिसराची साफसफाई करण्यासाठी किमान ७५० ते ८०० सफाई कर्मचाºयांची गरज आहे. मात्र सध्या प्रशासनाने केवळ ११० कर्मचाºयांकडेच स्वच्छतेची जबाबदारी देण्यात धन्यता मानली आहे. विशेष म्हणजे, पंचवटी परिसराचा काही भाग गावठाण असल्याने त्या भागात कायमच स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. पंचवटी विभागात सफाई कर्मचारी संख्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याने रस्त्यावर झाडू मारणारे तसेच धार्मिक स्थळे असलेल्या परिसराची स्वच्छता नियमित होत नसल्याचे दिसून येते.
लोकसंख्या तीन लाख, सफाई कर्मचारी अवघे ११० पंचवटी आरोग्य विभाग : लोकसंख्येनुसार मनुष्यबळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:28 AM
नाशिक महापालिकेच्या पंचवटी विभागातील सहाही प्रभागांची साफसफाई करण्याची जबाबदारी बोटावर मोजण्याइतकी म्हणजे केवळ ११० कर्मचाºयांवर असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
ठळक मुद्देमनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आरोग्य विभागाचा खरपूस समाचार