निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर (कोळवाडी) येथील विवाहितेला धाक दाखवून तिच्यावरील अत्याचार केल्याची अश्लील चित्रफीत मोबाइलद्वारे व्हायरल केल्याप्रकरणी मनोज दत्तात्रय सुपेकर (३५) या संशयितास निफाड पोलिसांनी अटक केली आहे. संशयितास १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निफाड तालुक्यातील श्रीरामनगर (कोळवाडी) येथील सुपेकर याने गावातीलच एका विवाहित महिलेला बदनामीचा धाक दाखवून तिच्या राहत्या घरात, द्राक्षबागेत वेळोवेळी अत्याचार केला. तसेच शिर्डी येथे पीडित महिलेवर त्याने अत्याचार केला. मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनवली व ती क्लिप इतरांच्या मोबाइलमध्ये पाठवून पीडित महिलेची बदनामी केली. निफाड पोलिसांनी सुपेकर याच्या विरोधात आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी सुपेकर यास निफाड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक दीपक गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस निरीक्षक रणजित डेरे करीत आहे.
विवाहितेची अश्लील चित्रफीत; एकास अटक
By admin | Published: June 14, 2016 11:20 PM