कसबे सुकेणे : शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पिंपळगाव बसवंत बाजार समिती व स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी तसेच या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रालयात दोन्हीही कारखान्यांसंदर्भात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संबंधित विभागांना देऊन भाडेतत्त्व प्रस्तावावर सकारात्मक चर्र्चा झाली.निफाड तालुक्याचे एकेकाळचे वैभव असलेले निफाड व रानवड हे साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.पिंपळगाव बसवंत बाजार समिती व स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था ही आर्थिक दृष्ट्या सक्षम पतसंस्था असून, सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामकाज केलेले आहे. या संस्थेस कारखाना चालविण्यास दिल्यास शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळेलच, त्याचबरोबर कामगारांच्या हाताला काम मिळून कारखान्यावर अवलंबून असणाºया इतर व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत चालू होतील, असे या बैठकीत बनकर यांनी उपस्थितांना सांगितले. बैठकीत अजित पवार यांनी भाडेतत्त्वावरील प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करून विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात येईल, असे सांगितले. पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहून कारखाने कसे सुरू करता येतील. यासाठी मी अजित पवार व संबंधित विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा करून तातडीने बैठक आयोजित केल्याचे बनकर यांनी सांगितले.---------------निसाका व रासाका साखर कारखाने सुरू होणे गरजेचे असून, शेतकऱ्यांची जनहित डोळ्यासमोर ठेवून या बाजार समितीने दाखल केलेल्या प्रस्तावास शासन स्तरावरून तातडीने परवानगी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगून सकारात्मक चर्चा केली आहे.- दिलीप बनकर,आमदार
निसाका-रासाका भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 5:24 PM
कसबे सुकेणे : शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पिंपळगाव बसवंत बाजार समिती व स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी तसेच या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रालयात दोन्हीही कारखान्यांसंदर्भात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संबंधित विभागांना देऊन भाडेतत्त्व प्रस्तावावर सकारात्मक चर्र्चा झाली.
ठळक मुद्देमंत्रालयात बैठक : विशेष बाब म्हणून परवानगी देण्याच्या सूचना