दिंडोरी : जीवनात स्वत: ध्येय नक्की करून नियोजनबध्द त्या ध्येयाचा पाठलाग केल्यास आपणच सर्व संकटावर मात करून स्वजीवनाचा शिल्पकार बनतो, जीवनात सकारात्मक विचारच व्यक्तीला यशस्वी करतो म्हणू न नकारार्थी विचार सारून आपण सकारात्मक विचार विद्यार्थी दशेतच अंगिककार्याला हवे असे आवाहन जिल्हा परिषद माद्यमिक विभागाचे उपजिल्हा शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी केले,कादवा कारखाना कार्यशलावरील राजारामनगर येथील बी,के,कावळे विद्यालय येथे आज जिल्हा परिषद उप शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी व्याखाना निमित्त सदिच्छा भेट दिली, त्यावेळी बोलत होते. या वेळी प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांनी शाल व श्रीफळ देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत केले, प्रास्ताविक देविदास देसले यांनी केले, मी असा घडलो या विशयावर चव्हाण यांनी शालेय जीवनापासूनचा प्रवास कथन केला. ते म्हणाले की, कोणतीच व्यक्ती नियोजन बद्ध परिश्रम केल्यायाशिवाय मोठी होत नाही कष्टाला पर्याय नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
जीवनात सकारात्मक विचार गरजेचे : चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 6:21 PM