नाशिक : जिल्ह्यात रविवारी एकूण ११३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १०० रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. तसेच जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेटची पुन्हा तीन टक्क्यांकडे वाटचाल सुरू झाली असून तो २.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे.
जिल्ह्यात दिवसभरात आढळलेल्या बाधितांमध्ये ५१ बाधित नाशिक ग्रामीणचे, ४३ नाशिक महापालिकेचे, २ मालेगाव महापालिकेचे, तर ४ जिल्हाबाह्य रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६२४ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या अद्यापही एक हजारावर म्हणजेच १००६ आहे. मात्र जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या २२० पर्यंत खाली आली आहे. त्यात सर्वाधिक १७० प्रलंबित अहवाल नाशिक महापालिकेचे, ३८ नाशिक ग्रामीणचे, १२ मालेगाव महापालिकेचे अहवाल प्रलंबित आहेत.