लासलगाव : स्थानिक पोलिसांतर्फे सलग दुसऱ्या विशेष मोहीम राबवित बुधवार १० वाहनचालकांवर कारवाई करीत २५०० रूपये दंड वसुल करण्यात आला. कालपासुन रोडरोमीयोविरुद्ध अचानक विविध ठिकाणी कारवाई केली गेली . त्यामुळे महाविद्यालय व शाळा परिसरातील विद्यार्थीनीची छेडखानी करणारांची पळापळ सुरू झाली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पालकांनी जोरदार स्वागत करीत ही मोहीम अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली आहे. काल सडक सख्याहरींना दणका देत सात रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली.सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी नागरिकांनी आपले पाल्य जर शाळा, महाविद्यालय, विद्यालयामध्ये शिक्षण घेत असतील आण ित्यांचे वय जर १८ वर्षाच्या आत असेल (अल्पवयीन) किंवा त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसेल तर अशा वाहनचालकांवर प्रचलित कायद्याखाली कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित पालकांनी आपल्या पाल्याकडे वाहन चालवण्यास दिल्यास प्रचलित कायद्यानुसार पाल्य व पालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे सांगितले. सदर मोहिमेंतर्गत येथील शाळा, महाविद्यालय परिसरातून रोड रोमिओंविरु द्ध शाळा कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करून रोड रोमियोविरु द्ध कायदेशीर कारवाई केली असल्याची माहिती रंजवे यांनी दिली. ही कारवाई रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्यासह योगेश शिंदे, हवालदार नंदकुमार देवडे, प्रदीप अजगे,कैलास महाजन यांनी केली.
लासलगावी दहा रोडरोमियो ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 2:51 PM