श्रावण महिना भगवान शिवाचे व्रतवैकल्ये करण्याचा महिना मानला जातो. सदर उपवास करतांना अगर प्रदक्षिणा करतांना एखादा सोमवार चुकला तरी तिस-या श्रावण सोमवारी उपवास धरुन प्रदक्षिणा परिक्र मा केल्यास चारही सोमवारचे पुण्य पदरी पडते अशी भाविकांची श्रध्दा आहे. म्हणूनच तिस-या श्रावण सोमवारी अफाट गर्दी होत असते. सायंकाळनंतर राज्यासह राज्याबाहेरील भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरु असल्याचे दिसून आले. काही जण सायंकाळीच देवस्थानच्या खोल्यांमध्ये तसेच हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले होते. जव्हार फाटा मेळा स्टँडवर हळुहळु गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून आले. रात्री उशीरा प्रदक्षिणेसाठी भाविकांचा जत्था ‘हर हर भोले’चा गजर करीत अनवाणी येताना दिसत होता. प्रदक्षिणा न करता केवळ भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शना साठी येणारे भाविक मात्र उद्या (दि.२७) दाखल होतील असा अंदाज आहे. तिसºया सोमवारच्या पार्श्वभूमीवर होणीरी गर्दी लक्षात घेता पोलीसांचा फौजफाटा व यंत्रणा सज्ज झाली आहे.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी गर्दीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:40 PM