नाशिक : यंदा आॅगस्टअखेरपर्यंत जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला असला तरी, पूर्व भागात पावसाने सलग दिलेल्या ओढीमुळे या भागातील पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्केघट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे. मात्र ठरविलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्णात यंदा साडेसहा लाख हेक्टरवर पीकपेरणी झाल्याचा दावाही कृषी विभागाने केला आहे. नाशिक जिल्ह्णात खरीप पेरणीचे ६.५३ लाख हेक्टर इतके क्षेत्र असून, त्यापैकी साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पश्चिम भागात भात, नागली, वरई या पिकांची पुनर्लागवड करण्यात येऊन पिके वाढीच्या स्थितीत आली आहेत. पूर्व भागात पेरणी पूर्ण होऊन बाजरी, मका व भुईमूग या पिकांनी फुलोरा धरून त्यात दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्णात ४७२ हेक्टर इतके क्षेत्र कापसाचे असून, त्याचीही लागवड होऊन त्याची अवस्था फूल व पाने लागण्याच्या स्थितीत आहे. उडीद व मूग या पिकांनी शेंगा पकडून हे पीक आता काही दिवसांनी काढणीला येतील.यंदा जूनमध्येच पावसाचे आगमन झाले व जुलै महिन्यातही त्याने आपला मुक्काम ठोकला, परंतु आॅगस्टच्या तीन आठवडे पावसाने पाठ फिरविली असे असले तरी, जिल्ह्णात वार्षिक सरासरीच्या ९० टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यातील पूर्व भागातील मालेगाव, बागलाण, देवळा या तालुक्यांमध्ये अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दिलेल्या दीर्घकालीन ओढीमुळे त्याचा परिणाम या भागातील पिकांवर झाला आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे पीक उत्पादनात दहा ते पंधरा टक्के घट येण्याची शक्यता कृषी खात्याने व्यक्त केली आहे.सोयाबीन, उसावर कीडजिल्ह्णात सोयाबीन व ऊस लागवडीचेही क्षेत्र असून, यंदा शेतकºयांचा सोयाबीन लागवडीकडे चांगला कल आहे. मात्र पावसाच्या कमी, अधिक येण्याने सोयाबीनने शेंगा धरल्या व पक्वतेच्या अवस्थेत असल्या तरी, सोयाबीनचे पाने खाणाºया अळींचा काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे ऊस पिकावर लोकरी मावा व पांढºया माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने या दोन्ही पिकांचा धोका वाढला आहे.
पूर्व भागातील उत्पादन घटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 1:14 AM