नाशिक : भारतीय हवामान विभागाने देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेची लाटेची सुरूवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार पुनाशिक शहर व जिल्ह्यातील काही भागांमध्ये पारा ४० अंशाहून ढे सरकल्याने व ही उष्णतेची लाट यंदा दिर्घकाळ टिकणार असल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे असल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यात सतर्कतेच्या सुचना दिल्या असून, नागरिकांनी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे असे आवाहन केले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, आणखी एक महिना उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील त्याचे मार्गदर्शक तत्वेही राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ठरवून दिली आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मंदिरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने दुपारी सुद्धा उघडी ठेवण्यात यावी जेणे करून दुपारच्या वेळेस लोकांना तेथे आश्रय देता येईल. त्याच बरोबर जिल्ह्यात पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या काळात रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी महत्वाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत करू नये याची काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 3:24 PM