शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
2
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
3
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
4
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
5
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
6
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
7
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
8
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
9
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
11
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
12
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
13
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
14
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
15
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
16
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
17
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
18
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
19
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
20
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार

नाफेडच्या कांदा खरेदीवर मर्यादा येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:46 AM

लासलगाव : कांद्याचे घसरते भाव थांबविण्यासाठी तसेच कांदा उत्पादकांना भाववाढीचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आतापर्यंत तब्बल १३ कोटी रु पये खर्च करून १२ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे; पण आता उर्वरित १३ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीवर मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसाठवणुकीचा प्रश्न : एका महिन्यात भावात २५ टक्क्यांनी घसरण

लासलगाव : कांद्याचे घसरते भाव थांबविण्यासाठी तसेच कांदा उत्पादकांना भाववाढीचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आतापर्यंत तब्बल १३ कोटी रु पये खर्च करून १२ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे; पण आता उर्वरित १३ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीवर मर्यादा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा साठवणुकीसाठी चाळीच उपलब्ध नसल्याने खरेदी केलेला कांदा ठेवायचा कुठे, असा प्रश्न आता नाफेडसमोर निर्माण झाला आहे.संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कांद्याची घसरण सुरूच असून, केंद्राने केलेल्या उपाययोजनाही कांदा घसरणीला ब्रेक लावू शकलेल्या नाहीत. कांद्यावरील किमान निर्यातमूल्य दर शून्य तसेच कांदा निर्यात प्रोत्साहन पाच टक्के अनुदान असून, कांदा भाव सुधारत नसल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. ३ जुलैला सरासरी १३०१ रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला जाणारा कांदा शुक्रवारी हजाररुपयांच्या घरात आला आहे. महिन्यामध्ये कांद्याच्या भावात २५ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.बदलत्या वातावरणाचा फटका चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला बसत असून, आज मिळणाºया भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शुक्रवारी येथील मुख्य बाजार समितीत ८५० वाहनांद्वारे कांद्याची आवक होऊन कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, सरासरी १०३० रुपये, तर जास्तीत जास्त १२३६ रुपये भाव मिळाला.वाहतूकदारांच्या संपाचा फटकाकांदा निर्यातीस चालना देण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातदारांकरिता निर्यात प्रोत्साहन योजना (एमइआयएस) अंतर्गत ५ टक्के अनुदान जाहीर केले आहे; पण वाहतूकदारांनी मागील महिन्यात पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे कांदा निर्यातदारांना अनुदान योजनेचा लाभ घेता आला नाही. वाहतूकदारांच्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील कांदा व्यापाºयांनी खरेदी केलेला पाच ते सहा लाख क्विंटल कांदा चाळीत पडून होता. कांदा निर्यातीला संपाचा फटका बसला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा