पंचवटी : दोन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पंचवटी प्रभागात सर्वांत जास्त १९ जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय संपादन केल्याने पंचवटीत भाजपा सर्वांत मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. पंचवटी प्रभागात दरवेळेस भाजपाला बहुमत मिळत असल्याने भाजपाचा सभापती होतो. यंदा येत्या शुक्रवारी (दि.५) प्रभाग समिती सभापती निवडणूक होणार आहे. पूर्णपणे भाजपाला बहुमत असल्याने गेल्यावर्षी प्रमाणे यंदा भाजपाचा सभापती होणार हे जवळपास निश्चित असले तरी भाजपाच्या वतीने नवीन चेहऱ्याला संधी देत निवडणूक बिनविरोध केली जाण्याची शक्यता आहे.पंचवटी विभागात असलेल्या सहा प्रभागात २४ नगरसेवक निवडून आलेले आहेत. यात प्रभाग क्रमांक १,२,३,४,५,६ या सहा प्रभागांचा समावेश होतो. निवडून आलेल्या एकूण २४ नगरसेवकांपैकी भाजपा-१९, मनसे-२, अपक्ष-२, शिवसेना-१ असे पक्षीय बलाबल असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही सदस्य निवडणुकीत निवडून आले नाही.विद्यमान नगरसेवकांत विद्यमान महापौर रंजना भानसी, गणेश गिते, प्रभाग सभापती पूनम धनगर, प्रियंका माने, अरुण पवार, रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, उद्धव निमसे, सुरेश खेताडे, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, शांता हिरे, सरिता सोनवणे, भिकूबाई बागुल, कमलेश बोडके, पुंडलिक खोडे, सुनीता पिंगळे आदी भाजपाकडून निवडून आले आहे, तर मनसेकडून माजी महापौर अशोक मुर्तडक, नंदिनी बोडके, तर माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, काँग्रेस बंडखोर विमल पाटील हे दोघे निवडून आले आहे. शिवसेना पक्षाकडून एकमेव पूनम मोगरे या निवडून आलेल्या आहेत.भाजपाच्या वतीने पंचवटीतील अनेक नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य, विधी समिती व अन्य विविध समित्यांवर नियुक्ती केल्याने सर्वांना संधी मिळावी म्हणून दरवर्षी नवीन चेहºयाला संधी दिली जात आहे.सानप यांच्या निर्णयावर शिक्का मोर्तबभाजपाने पहिल्यावेळी महिला उमेदवार म्हणून प्रियंका माने यांना संधी दिली होती, तर दुसºया वर्षी धनगर यांना सभापती केले होते. आता पंचवटी प्रभाग सभापतिपदाचा कार्यकाल पूर्ण होत आल्याने नवीन चेहरा म्हणून आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप हे ज्या नगरसेवकाच्या नावावर शिक्का मोर्तब करतील त्या नगरसेवकाची पंचवटी प्रभाग समिती सभापती म्हणून निवड होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
पंचवटी प्रभाग बिनविरोध होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:46 AM