शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

प्रलंबित मागण्यांसाठी पोस्टमनकडून काळ्या फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 1:49 PM

मुख्य टपाल कार्र्यालयासह कॉलेजरोड, गोळे कॉलनी, द्वारका, गांधीनगर, उपनगर, सातपूर आदि कार्यालयांमधून टपालाचा बटवडा करणा-या पोस्टमन कर्मचा-यांनी खाकी गणवेशावर काळ्या फिती लावून कामकाजाला सुरूवात केली.

ठळक मुद्देसलग तीन दिवस काळ्याफिती बांधून कामकाज करण्याचा निर्णय १४ डिसेंबर रोजी विभागीय टपाल कार्यालय, मुख्य टपाल कार्यालयापुढे निदर्शने

नाशिक : महाराष्ट परिमंडळातील सर्व पोस्टमन (टपालवाहक) कर्मचारी वर्गाने टपाल प्रशासन अन सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह उपकार्यालयांमध्ये पोस्टमनकडून काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हे चित्र येत्या गुरूवारपर्यंत (दि.२९) कायम राहणार आहे.टपाल विभागाचा पाठीचा कणा असलेला पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक हा मागील अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. एकीकडे आय.पी.पी.बी आणि वीज सर्वेक्षणासारख्या जबाबदाऱ्या सोपविणा-या सरकारकडून पोस्टमनच्या न्यायहक्कांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. यामुळे  कृती समितीने देशव्यापी आंदोलनाचा आराखडा आखला आहे. त्याची सुरूवात काळ्या फिती लावून कामकाजाने करण्यात आली. पोस्टमन हा दुर्लक्षित राहिलेला घटक असून या घटकाद्वारे सलग तीन दिवस काळ्याफिती बांधून कामकाज करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. १४ डिसेंबर रोजी पोस्टमन विभागीय टपाल कार्यालय, मुख्य टपाल कार्यालयापुढे निदर्शने करणार आहेत. नव्या वर्षाच्या दुस-या दिवशी महाराष्ट सर्कलच्या कार्यालायापुढे धरणे आंदोलन आणि ६ फेब्रुवारी नवी दिल्ली येथील डाकभवनावर एकदिवसीय धरणे आंदोलन करुन देशव्यापी संपाची दिवस घोषित केला जाणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. राज्यभरातील पोस्टमन गणवेश भत्त्यापासून अतिरिक्त जागा भरण्यापर्यंतच्या विविध मागण्यांसाठी पोस्टमन कृती समितीच्या नावाखाली एकत्र आले आहेत. सरकारच्या नवनवीन योजना तसेच उंचच उंच इमारतींमुळे कर्मचा-यांवर कामाचा वाढता ताण निर्माण झाला आहे. दरम्यान, शहरातील जीपीओ रस्त्यावरील मुख्य टपाल कार्र्यालयासह कॉलेजरोड, गोळे कॉलनी, द्वारका, गांधीनगर, उपनगर, सातपूर आदि कार्यालयांमधून टपालाचा बटवडा करणा-या पोस्टमन कर्मचा-यांनी खाकी गणवेशावर काळ्या फिती लावून कामकाजाला सुरूवात केली. 

अशा आहेत प्रमुख मागण्या*पोस्टमन, एमटीएस कर्मचा-यांच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरल्या जाव्या.*२५००० नवीन अतिरिक्त जागा राज्यात निर्माण कराव्या.*सर्व स्तरावरील मासिकसभेपासूनचे नियोजन करावे.*पोस्टमनला दारोदारी जाण्याचा अधिक वेळेचा भत्ता द्यावा.*आऊट सोर्स पोस्टल एजंट योजना तातडीने बंद करा*कॅश ओव्हरसियर व पोस्टमन मोठ्या प्रमाणात रोकड हाताळतात, त्यांना विमा संरक्षण द्या.*एलजीओ परिक्षेमधून अनावश्यक असलेले संगणक कौशल्य चाचणीचा पेपर वगळण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी पोस्टमन कर्मचाºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकPost Officeपोस्ट ऑफिस