मुलींच्या भवितव्याचा विचार करून केंद्राच्या वतीने सुकन्या योजना सुरू करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या काळात या योजनेला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. त्या तुलनेत ग्रामीण भागात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने रविवारी जागतिक कन्या दिवसाचे औचित्य साधून निफाड तालुक्यातील चाटोरी येथे मोहीम राबविण्यात आली. नाशिक विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव यांनी यावेळी योजनेबाबत गावातील महिलांना माहिती दिली. यावेळी दहा पालकांनी या योजनेचा शुभारंभही केला.
सन २०१५ मध्ये केंद्राच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात अपेक्षित असा प्रचार आणि प्रसार होऊ शकला नाही. मात्र, शहरी भागात सुरुवातील या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. असाच प्रतिसाद ग्रामीण भागातून मिळावा यासाठी टपाल खात्याने विशेष मोहीम राबविली. दहा वर्षांच्या आतील मुलींना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी आता गावागावात जनजागृती करण्याचा विचार असल्याने अहिराराव यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी सरपंच सारिका गणेश हांडगे, उपसरपंच भाऊसाहेब घोलप, माजी सरपंच किरण धोंगडे, तसेच गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.
विभागीय टपाल कार्यालयातील किरण वरपे यांनी योजनेची माहिती दिली. शाखा टपाल मास्तर दीपाली पवार यांनी गावातील लोकांमध्ये योजना रुजविण्याचे नियोजन करून सहभागासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी नाशिक विभागातील कर्मचारी घनश्याम देशपांडे, ज्ञानेश्वर गोरे, अमोल शिंदे, अरुण दुसाने, सोपान खालकर, गणेश वंदे यांनी प्रयत्न केले.
260921\26nsk_34_26092021_13.jpg
निफाड येथील चाटोरी येथे सुकन्या योजनेसाठी जनजागृती