उपनगर येथील पोस्टल स्टोअर डेपोमध्ये टपाल कर्मचाºयांसाठी सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे उद््घाटन करताना महाराष्टÑ सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल. समवेत औरंगाबाद विभागाचे पोस्टमास्तर जनरल प्रणव कुमार, अधिकारी व कर्मचारी.
नाशिकरोड : शासनाच्या डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफार्मर (डीबीटी) योजनांचा लाभ ग्रामीण भागातील खºया लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आता या योजनांचा निधी थेट पोस्टमनद्वारे लाभार्थ्यांना घरपोहोच देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्याचे महाराष्टÑ सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.उपनगर येथील डाक विभागाच्या पोस्टल स्टोर डेपोमध्ये डाक कर्मचाºयांसाठी राज्यातील पहिले प्रशिक्षक केंद्राचे सोमवारी पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल व औरंगाबाद विभागाचे पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत अग्रवाल यांनी सांगितले की, पोस्टाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामीण भागातदेखील आॅनलाइन सेवा सुरू करण्यात येत आहे. तसेच इंडिया कोअर बॅँकेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्यासाठी सुमारे १३०० टपाल कार्यालयातून इंडियन पोस्टल पेमेंट बॅँक सुविधा करण्यात येत असूनही मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे अग्रवाल यांनी सांगितले. नवीन कार्यप्रणालीचे प्रशिक्षण घेणे कर्मचाºयांसाठी गरजेचे आहे. महाराष्टÑ विभागातील टपाल कर्मचाºयांना प्रशिक्षणासाठी वडोदरा येथे जावे लागत होते. मात्र पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी नाशिकरोडमध्येच हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. देशात टपालाच्या व्यवसायामध्ये महाराष्टÑाचा २० टक्के वाटा असल्याचेदेखील अग्रवाल यांनी सांगितले.या प्रशिक्षण केंद्रात प्रत्येक वर्गात २७ कर्मचारी एका वेळी बसू शकतील असे चार वर्ग तयार करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष कर्मचाºयांसाठी स्वतंत्र वसतिगृह असून, एकूण ७२ प्रशिक्षणार्थी राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी सहायक संचालक म्हणून राजपत्रित एक अधिकारी, एक वरिष्ठ प्रशिक्षक, ३ प्रशिक्षक, ४ सहायक कर्मचारींची नेमणूक करण्यात आली आहे.यावेळी असिस्टंट पोस्टमास्तर जनरल एस. बी. व्यवहारे, मुंबई विभागाचे एडीपीएस रूपेश सोनावले, संतोष कुलकर्णी, नाशिक विभागाचे एसएसपीओ पी. जे. काखंडकी, औरंगाबाद विभागाचे एडीपीएस एस. बी. लिंगायत, नाशिकचे अधीक्षक एस. आर. फडके, एच. इ. खडकीकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. टपाल कार्यालयात मिळणार आधारकार्डप्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून आधारकार्डचे प्रशिक्षण टपाल कर्मचाºयांना देण्यास सुरूवात करण्यात आली. नागरिकांना आता टपाल कार्यालयात आधारकार्डमधील चुका (अपडेशन सेक्शन) दुरूस्त करता येणार असून, लवकरच आधार कार्डदेखील काढता येणार आहे. देशात सध्या गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये हे प्रशिक्षण केंद्र होते, आता महाराष्टÑात सुरू करण्यात आले आहे.