शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मुक्त विद्यापीठाचा २८ चा पेपर पुढे ढकलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:31 AM

यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या मे सत्रातील परीक्षांना प्रारंभ झाला असून, राज्यातील ७३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २८ रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला असून, सदर पेपरचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. काही केंद्रांवरील परीक्षेची वेळ आणि प्रश्नपत्रिकांतील त्रुटी वगळता राज्यात सर्वत्र परीक्षा शांततेत पार पडली असून, कोणतीही तक्रार परीक्षा विभागाला प्राप्त झाली नसल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या मे सत्रातील परीक्षांना प्रारंभ झाला असून, राज्यातील ७३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २८ रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला असून, सदर पेपरचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. काही केंद्रांवरील परीक्षेची वेळ आणि प्रश्नपत्रिकांतील त्रुटी वगळता राज्यात सर्वत्र परीक्षा शांततेत पार पडली असून, कोणतीही तक्रार परीक्षा विभागाला प्राप्त झाली नसल्याचे विद्यापीठाने कळविले आहे. राज्यातील ७२६ परीक्षा केंद्रांवरून सुमारे ६ लाख ४५ हजार १५७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बीए. बीकॉम, बीएस्सी,बी-लिब, वृत्तपत्रविद्या, कृषी, वाणिज्य, व्यवस्थापन, संगणकशास्त्र, आरोग्य आदी विविध ९६ अभ्यासक्रमांच्या १०२३ विविध विषयांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. सुमारे ५ लाख ८३ हजार ७३० विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहेत, तर ६१ हजार ४२७ विद्यार्थ्यांची परीक्षा ही आॅनलाइन पद्धतीने होणार आहे. नांदेडमधील विद्यार्थ्यांची संख्या ९६ हजार ९३० इतकी आहे. सर्वात कमी ४३ हजार ६६१ विद्यार्थी हे मुंबई विभागीय केंद्रातील आहेत. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, पुणे, मुंबई व नाशिक या आठ विभागीय केंद्रांवर सदर परीक्षा होत आहे.संवेदनशील परीक्षा केंद्रराज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या संवेदनशील परीक्षा केंद्रावरदेखील परीक्षा होत असून, एकूण आठ दुर्गम भागातील केंद्रांवर परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी ४ हजार ८६४ विद्यार्थी बसलेले आहेत.  रद्द झालेला पेपर अखेरच्या दिवशी  महाराष्टतील भंडारा, पालघर आणि गोंदिया या मतदारसंघांमध्ये लोकसभा पोटनिवडणूक असल्याने दि. २८ रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आलेला आहे. सदर पेपर हा ज्या अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच घेतला जाणार आहे, अशी माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :examपरीक्षा