नाशिक शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने शिक्षकांनी शिक्षण उपसंचालकांना निवेदन देत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम थांबविण्याची मागणी केली होती. शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन अखेर शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी या मोहिमेस १५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नाशिक शहरातील शाळा १५ दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. मात्र याच कालावधीत शिक्षण विभागाने शिक्षकांना शाळा बाह्य सर्वेक्षणाची मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. याविरोधात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि जिल्हा माध्यमिक शिक्षण संघाने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची भेट घेऊन तूर्तास या मोहिमेला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर उपासनी यांनी शुक्रवारी (दि. ५) आदेश काढत या मोहिमेस १५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे.
शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:14 AM