नांदगाव : मार्केट पाडण्याची कारवाई करू नये, या मागणीसाठी उच्च न्यायालयात गाळेधारकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने दि. १५ डिसेंबरपर्यंत गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. यापूर्वी दाखल याचिकेवर दि. ३ डिसेंबरपर्यंत स्थगिती मिळाली होती, ती आता १५ तारखेपर्यंत वाढली. याच विषयावरील मूळ याचिका व फेरयाचिका दाखल झाल्यावर न्यायालयात त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान एका आठवड्याच्या आत पालिकेला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले व दि. १५ डिसेंबरपर्यंत गाळे पाडू नये असा स्थगनादेश दिला. पालिकेला गाळेधारकांनी गाळे खाली करून दिले नाहीत तसेच पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मटण मार्केट बांधकामाबाबत मागितलेल्या परवानगी व अन्य बाबतीत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचेही निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
गाळे पाडण्याच्या प्रक्रियेला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 11:02 PM