शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे'

By अझहर शेख | Published: April 08, 2023 2:23 PM

पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आदेश

नाशिक : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जलसाठे वेगाने खालावण्याची श्यक्यता हवमान खात्याने वर्तविली आहे. यामुळे जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई भासू शकते. याबाबत जिल्हा प्रशासनाने आतापासूनच त्या परिस्थितीविषयीचे प्रत्येक गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. पिण्याच्या पाण्याला अधिकाधिक प्राधान्य दिले जावे. शहरासह जिल्ह्यातील गावांमध्येही पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आतापासूनच जनप्रबोधनावर भर द्यावा, अशी सुचनाही त्यांनी यावेळी बैठकीत केली.

शनिवारी (दि.८) दादा भुसे हे नाशिक शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागाच्या विविध अधिकाऱ्यांसोबत संभाव्य पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी दादा भुसे म्हणाले, पाणी टंचाईचे नियोजन करताना ते गावपातळीवरचे असावे. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांपासून तर खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासनाने विश्वासात घ्यावे. त्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे अंतीम टप्प्यात पोहचलेली आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावे, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. त्यासाठी सर्व प्रांताधिकारी यांनी संबंधित विभागांच्या स्थानिक पातळीवर बैठका घेवून आवश्यकेनुसार नियोजन करण्याचे आदेश दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, उमेश वावरे, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. पुलकुंडवार, डॉ. गुंडे व शिंदे यांनी पाणी टंचाईबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दृकश्राव्य यंत्राद्वारे सादर केली.

जंगलातील पाणवठे कोरडेठाक नको!माणसांसह वन्यप्राण्यांच्याही पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यावर भर द्यावा. वनविभागाने यासाठी त्यांच्या वनक्षेत्रातील वनतळ्यांची तातडीने दुरूस्ती करावी, तसेच सर्व पाणवठे अद्ययावत करुन आवश्यकतेनुसार नव्याने काही पाणवठे तयार करावेत, मात्र हे पाणवठे कोरडेठाक राहणार नाही, याची काळजी घ्यावी, संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तशा सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कराव्यात, असही दादा भुसे म्हणाले. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, याचा विसर प्रशासनाने पडू देऊ नये.

अधिकाऱ्यांनी ‘फिल्ड’ दौरा करावाजिल्ह्यात टंचाई काळात गावपातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल, यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत. यासाठी अधिकारी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाहणी करावी. तसेच नादुरूस्त कुपनलिकांची कामे ‘मिशन मोड’वर घेवून तातडीने दुरूस्त करत कुपनलिका अद्ययावत कराव्यात. शहरासह ग्रामिण भागात पाण्याचा अपव्यव होणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर अधिकाधिक भर आतापासून द्यायला हवात, अशी सुचनाही त्यांनी केली.

टॅग्स :Nashikनाशिक