शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नियतीचे कालचक्र फिरल्याने कुंभार कारागीर गपगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:49 PM

येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योगव्यवस्थाच कोलमडली. गावखेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागीर वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ बनवतो, कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्याने कुंभार कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चक्र फिरवत नवनिर्मिती करणाऱ्या या कारागिरांना नियतीचे कालचक्र फिरल्याने ऐन हंगामात घरात गपगार बसण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट : ऐन हंगामात माठ घरात पडून, आर्थिक झळ

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योगव्यवस्थाच कोलमडली. गावखेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागीर वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ बनवतो, कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्याने कुंभार कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चक्र फिरवत नवनिर्मिती करणाऱ्या या कारागिरांना नियतीचे कालचक्र फिरल्याने ऐन हंगामात घरात गपगार बसण्याची वेळ आली आहे.उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये माठ, रांजण गरिबांचे फ्रीज म्हणून बाजारात विक्रीसाठी येत असतात; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व संचारबंदी लागू असल्याने गावोगावचे बाजार बंद झाले आहेत. बाजार नाहीत, परिणामी विक्री नाही यामुळे कुंभार कारागिरांपुढे पोटाची खळगी भरायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मार्च, एप्रिल, मे या कालावधीत मातीच्या माठ, रांजण यांना मोठी मागणी असते. यादरम्यान जमा झालेल्या पुंजीवर संपूर्ण वर्षाचे गणित कुंभार कारागीर जमवतात. कोरोना आपत्तीने या व्यवसायावर मोठे संकट ओढवले असून, कुठपर्यंत हे लॉकडाउन चालेल व कधी बाजारपेठ खुली होईल याबाबत साशंकता असल्याने कुंभार कारागीर आर्थिक संकटात सापडला आहे. परंपरागत कला जपत माठ बनवण्याव्यतिरिक्त पोट भरण्याचे दुसरे साधन नसणाºया कुंभार कारागिरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे माठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य माती, उसाचा भुकठा, भाजण्यासाठी लागणारे इंधन यांचा खर्चही अंगावर पडला आहे. शासनाने कुंभार कारागिरांना उदरनिर्वाहासाठी मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. आमचा पिढीजात व्यवसाय आहे.या व्यवसायात आमची हयात घालवत आहे. आवामध्ये जसा माठ भाजावा तसे आमचेहृदय माठ तयार करूनही विक्री होत नसल्याने भाजत आहेत.- रंगनाथ जाधव,कारागीर, कुसूर

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या