मुंजवाडसह परिसरातील चौंधाणे, खमताने, नवेगांव, निरपूर, तरसाळी, औंदाणे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या दिवशी जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. या वादळात मुंजवाड येथील पुंडलिक आनंदा जाधव यांचा पोल्ट्री फार्म जमीनदोस्त झाला. या शेडमध्ये पंधरा दिवसांपूर्वीच पाच हजार पक्षी ठेवण्यात आले होते. यातील जवळपास दोन हजार पक्षी मृत झाले आहेत. तसेच वादळामुळे त्यांचा एक एकरातील शेडनेटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या शेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र अर्जुन जाधव हे आपल्या कुटुंबासह पोल्ट्री शेडला लागून असलेल्या घरात कुटुंबासह टीव्ही पाहत होते. वादळामुळे पत्रे उडू लागताच त्यांनी खाटेखाली आसरा घेतला. काही कळायच्या आतच घराची भिंत कोसळून संपूर्ण कुटुंबच ढिगाऱ्यात दबले गेले. सुदैवाने मच्छिंद्र जाधव कसेबसे ढिगाऱ्यातून बाहेर आले. शेजारी असलेल्या चुलतभावांना बोलवून पत्नी सुनीता, मुलगी अमिषा व मुलगा साई यांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने कोणताही दुर्दैवी प्रसंग या कुटुंबावर आला नाही. नरेंद्र जाधव यांच्या कुटुंबास काढण्यासाठी गोकुळ जाधव, रवींद्र जाधव, दीपक जाधव, संदीप जाधव व परिसरातील ग्रामस्थांनी मदत केली. वसंत जाधव यांचेही शेड उडून कांद्याचे नुकसान झाले आहे. पोलीसपाटील दीपक सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना दिली. आमदार बोरसे यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना फोन करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
फोटो- ३० मुंजवाड रेन
मुंजवाड येथे नरेंद्र जाधव यांच्या पोल्ट्रीसह संसारोपयोगी साहित्याचे झालेले नुकसान.
===Photopath===
300521\30nsk_55_30052021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० मुंजवाड रेन मुंजवाड येथे नरेंद्र जाधव यांच्या पोल्ट्रीसह संसारोपयोगी साहित्याचे झालेले नुकसान.