नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे गुरु वारी (दि.२) दुपारी अचानक आलेल्या वादळाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री व शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.मानोरी - पळसखेडे रस्त्यालगत म्हस्के वस्तीजवळ मच्छींद्र शिवराम पवार यांची शेतजमीन आहे. शेतगट नंबर ६०४ मध्ये दीड महिन्यापूर्वीच त्यांनी कुक्कुटपालनासाठी पोल्ट्री शेडचे बांधकाम केले होते. येथे पत्र्याच्या शेडचे कामही करण्यात आले होते. गुरु वारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने पवार यांच्या पोल्ट्रीशेडच्या सिमेंट पत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही पत्रे तुटून पडले तर काही लांब अंतरावर जाऊन पडले. अचानक वादळाने उग्र रूप धारण केल्याने शेडचे संपूर्ण पत्रे उडून या शेतकºयाचे नुकसान झाले आहे. शेजारील शेतकºयांनी पवार यांना भ्रमणध्वनीवरु न घटनेची माहिती दिली. वादळात पवार यांचे अंदाजे दोन लाख रु पयांचे नुकसान झाले आहे.
मानोरी येथे पोल्ट्रीचे वादळाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:31 AM
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी येथे गुरु वारी (दि.२) दुपारी अचानक आलेल्या वादळाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री व शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
ठळक मुद्देअंदाजे दोन लाख रु पयांचे नुकसान