भारत प्रतिभूती आणि चलार्थ मुद्रणालयात वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत दोन्ही मुद्रणालयात कामगार पॅनलने वर्क्स कमिटीची सत्ता हस्तगत केली आहे.
भारत प्रतिभूती आणि चलार्थ पत्र मुद्रणालयात वर्क्स कमिटीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले होते. चलार्थ पत्र मुद्रणालयात वर्क्स कमिटीच्या कामगार प्रतिधिनीच्या तेरा व स्टाफच्या दोन अशा पंधरा जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये कामगार पॅनलचे अरुण चव्हाणके (६४१), नंदू कदम (६२८), योगेश कुलवधे (६१४), दिनेश कदम (५७१) सुभाष ढोकणे (५४७), संजय गटकळ (५३८), बाळू ढेरिंगे (५३६), विनोद घाडगे (५२४), राजेश काजळे (४९२), शरद अरिंगळे (४८८) हे विजयी झाले. तर आपला पॅनलचे अनिल जाधव (६११), हरिभाऊ ढिकले (५८४), शेखर वाईकर (५१२) हे विजयी झाले. स्टाफ विभागातून विनोद ढेरिंगे (११५), नागेश देशमुख (९४) विजयी झाले.
भारत प्रतिभूती मुद्रणालयात कामगार प्रतिनिधी ११ जागा, स्टाफच्या तीन अशा १४ जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये कामगार पॅनलचे सचिन तेजाळे (६४८), बी. जे. मेढे (६०३), डी. के. गवळी (४८२), भीमा नवाळे (५६३), चंद्रकांत हिंगमिरे (५५४), बी. के. सैदपाटील (५४३) हे विजयी झाले. तर आपला पॅनलचे दगू खोले (६९९), बाळासाहेब चंद्रमोरे (६५५), पी. एस. उगले (५८२), डी. जे. ढोकणे (५७७), सतीश निकम (५६८) हे विजयी झाले. स्टाफमध्ये राहुल रामराजे (१२०), तुषार सावसाकडे (११६), दिलीप जायभावे (८२) हे विजयी झाले.
चलार्थपत्र मुद्रणालयात कामगार विभागातून कामगार पॅनलचे दहा व आपला पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले. भारत प्रतिभूती मुद्रणालयात कामगार पॅनलचे सहा व आपला पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले. दोन्ही मुद्रणालयात स्टाफ गटातून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी कामगार पॅनलला पाठिंबा दर्शविल्याने दोन्ही मुद्रणालयातील वर्क्स कमिटीत कामगार पॅनलची सत्ता आल्याचा दावा कामगार पॅनलने केला आहे.