नाशिक : महावितरणकडून नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरासह शहरताली विविध भागातील वीजपुरवठा नियमित खंडीत होत असून विजेच्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून विविध या भागातील विद्युत उपकेंद्रावरी वाढता ताण कमी करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महावितरण कंपनीचे इंदिरानगर परिसरात स्वतंत्र सब स्टेशन झाल्यास सुमारे २५ वर्षापासून सुरू असलेल्या विजेच्या लंबडावाचा प्रश्न सुटणार आहे. सध्या इंदिरानगर कक्ष कार्यालय अंतर्गत सुमारे पंचवीस हजार ग्राहक आहेत. भारतनगर सबस्टेशनमधून भारतनगर, शिवाजी वाडी विनय नगर ,साईनाथ नगर, दिपालीनगर, सुचितानगर, वडाळा गाव, कमोदनगर, जयदीप नगरसह परिसरास विद्युत पुरवठा करण्यात येतो, तर पाथर्डी सबस्टेशन मधून वडाळागाव, इंदिरानगर मेहबूबनगर, समर्थनगर, सराफनगर, शरयूनगर, पांडवनगरी, कैलासनगर, सार्थकनगर, राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, श्री राजसारथी सोसायटी, रथचक्रसोसायटी, महारुद्र्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, आत्मविश्वास सोसायटी सह परिसराला विद्युत पुरवठा करण्यात येतो. इंदिरानगरच्या या भागात सुमारे दहा वषार्पासून नियमित विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत भारतनगर व पाथर्डी सब स्टेशनच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे वीजग्राहकांची संख्याही वाढत असून या दोन्ही उपकेंद्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक वीजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरातीतल वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याची प्रकार घडत असून पावसाळ्यात आणखीच भर पडत असल्याने इंदिरानगरवासियांकडून परिसरासाठी स्वतंत्र सब स्टेशन सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे
शहरात विजेचा लंपडाव, नागरिक त्रस्त ; विद्युत उपकरणांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 1:17 PM
शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांची घरघुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले असून विविध या भागातील विद्युत उपकेंद्रावरी वाढता ताण कमी करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठळक मुद्देविजेच्या लपंडावनाने नागरिक त्रस्त उपकरणे नादुरुस्त होत असल्याने नाराजी