नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार वा-यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वा-यामुळे अनेक झाडासंह वीजेचे खांब पडुन वीज पुरवठा खंडीत झाला.नायगाव खो-यातील परिसरात शुक्रवार व शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली.अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सलग दोन दिवस आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचुन नुकतीच लागवड झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वा-यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार झाले. तसेच वीजेचे खांब व तारा पडल्याने नायगाव खो-यातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.दोन दिवस पडलेल्या पावसामुळे छोटे-मोठे खड्डे भरले आहे. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास व खरिपाच्या हंगामास मदत होणार असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त होत आहे.
वादळी वाऱ्यामुळे विज पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 7:10 PM
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार वा-यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वा-यामुळे अनेक झाडासंह वीजेचे खांब पडुन वीज पुरवठा खंडीत झाला.
ठळक मुद्देसिन्नर तालुक्यातील नायगावी दुसऱ्या दिवशीही पाऊस