शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

By admin | Published: February 19, 2017 11:09 PM

तोफा थंडावल्या : आठवडे बाजाराची संधी साधत, सभा-रॅलींद्वारे मतदारांशी संपर्क

नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या सात दिवसांपासून धडाडणाऱ्या तोफा रविवारी थंडावल्या. गटातील मोठ्या गावांमध्ये विविध पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढून शक्तिप्रदर्शन केले. तर काही उमेदवारांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही घरोघरी जाऊन प्रचार करणेच पसंत केले.  मागील सात दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचारासाठी अगदी कमी कालावधी मिळाल्याने गट आणि गणातील प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. सकाळपासून संधाकाळपर्यंत पायपीट करून त्यांनी गावोगावच्या मतदारांपर्यंत आपले प्रचार पत्रक पोहोचविले. सकाळपासून सायंकाळपर्यंतचे नियोजन करून कार्यकर्त्यांसह गावोगावच्या स्थानिक नेतेमंडळींना बरोबर घेउन प्रचारफेऱ्या काढल्या. बहुतेक सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी वाहनांवर ध्वनीक्षेपक लावून गावोगावी प्रचार केला. महापालिका निवडणुकांचा जाहीर प्रचार रविवारी सायंकाळी ५.३० वाजता संपला असला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रचाराची मुदत रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत असल्यामुळे गावोगावी रात्री उशिरापर्यंत उमेदवार आणि त्यांचे समर्थक फिरताना दिसून येत होते. इगतपुरी तालुक्यात घोटीसह काही गावांमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पक्षीय उमेदवारांनी एकत्रीतपणे प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेत शक्तिप्रदर्शन केले.  चांदवड तालुक्यात बहुतेक उमेदवारांनी घरोघरी जाउन प्रचार करणे पसंत केले. कॉँग्रेसने काजीसांगवी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची तर भाजपाने दुगाव येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले.  सिन्नर तालुक्यात वावी, नांदूरशिंगोटे, मुसळगाव, वडांगळी, ठाणगाव, देवपूर, पांढुर्ली यासारख्या गावांमध्ये गट आणि गणातील उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पेठ, सुरगाणा, दिंडोरी या आदिवासी तालुक्यांमध्ये उमेदवारांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला. नांदगाव तालुक्यात कॉँग्रेसने न्यायडोंगरी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा घेतली.  सटाणा तालुक्यात भाजपाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत प्रचारफेरी काढली. शिवसेनेने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत लखमापूर आणि नामपूर या दोन ठिकाणी प्रचारफेरी काढली. कळवण तालुक्यात रविवारी कनाशीचा आठवडे बाजार असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे या ठिकाणी प्रचारफेरी काढली. तर इतर पक्षाच्या उमेदवारांनी बाजाराची संधी साधून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.  रात्री बारा वाजेपर्यत प्रचाराला वेळ मिळाल्याने रात्री उशिरापर्यंत गावा गावात उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या चौक सभा सुरू होत्या.