एकलहरे : येथील औष्णिक विद्युत केंद्र वाचविण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रकल्प बचाव समितीचे शिष्टमंडळ पालकमंत्री गिरीश महाजन यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय एकलहरे येथे झालेल्या प्रकल्प बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला.एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट तीन संच बंद करण्यात येणार असल्याने व प्रस्तावित ६६० मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू होत नसल्याने जुने संचाचे नूतनीकरण करणे व प्रस्तावित प्रकल्प होण्यासाठी एकलहरे कॉलनीतील हनुमान मंदिरात लोकप्रतिनिधी व पंचक्रोशीतील नागरिकांची बैठक झाली. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप. प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष शंकर धनवटे. मनपा प्रभाग सभापती पंडित आवारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे, नगरसेवक बाजीराव भागवत, निवृत्ती चाफळकर, व्यापारी बँकेचे संचालक प्रकाश घुगे, तानाजी गायधनी, नगरसेवक विशाल संगमनेरे, ओढ्याचे सरपंच दादा पेखळे, एसईए चे केंद्रीय पदाधिकारी सूर्यकांत पवार आदी उपस्थित होते. यावेळी हेमंत गोडसे म्हणाले की, वीज निर्मिती केंद्र नाशिक वैभव आहे. प्रकल्प बंद झाल्यास हजारो कुटुंबावर उपसामारी वेळ येईल. यासाठी येथील जुन्या संचांचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. नूतनीकरण झाल्यास पंधरा ते वीस वर्षे संच चालू राहतील. तसेच ६६० मेगावॉट प्रकल्पही लवकर सुरू व्हावा यासाठी सर्वांना सोबत घेऊन आंदोलन करू अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी आमदार सानप म्हणाले की, एकलहरे प्रकल्प वाचविण्यासाठी लवकरच जिल्ह्यातील दोन खासदार, पंधरा आमदारांना घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासन सानप यांनी दिले. प्रकल्पासाठी पक्षभेद विसरून प्रयत्न करणार आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली जाईल. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना कुठल्याही प्रकारच्या मोर्चा किंवा आंदोलनाची गरज पडणार नाही असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार योगेश घोलप यांनीही स्थानिक प्रतिनिधी म्हणून एकलहरेवासीयांच्या पाठीशी उभे राहून सर्वांसोबत हा जिव्हाळ्याचा प्रश्न शासन दरबारी मांडून तो लवकरात लवकर कसा मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी दौलत जगताप, प्रकाश घुगे, राजाराम धनवटे, निवृत्ती चाफळकर, सुयोग झुटे, सूर्यकांत पवार यांनीही तांत्रिक व भौगोलिकदृष्ट्या एकलहरेचा प्रकल्प होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले. आभार विशाल संगमनेरे यांनी मानले. कार्यक्रमास सागर जाधव, योगेश म्हस्के, विजय जगताप, योगेश भोर, रामदास सदाफुले, लकी ढोकणे, सुदाम ताजनपुरे, आप्पा माने, रामदास डुकरे, प्रभाकर रेवगडे, रामचंद्र शिंदे, किशोर बागुल यांच्यासह सामनगांव, कोटमगांव, चाडेगाव, हिंगणवेढे, माडसांगवी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.
वीज प्रकल्प बचाव समिती मुख्यमंत्र्यांंना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 1:29 AM
एकलहरे : येथील औष्णिक विद्युत केंद्र वाचविण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रकल्प बचाव समितीचे शिष्टमंडळ पालकमंत्री गिरीश महाजन यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय एकलहरे येथे झालेल्या प्रकल्प बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देएकलहरे : औष्णिक विद्युत केंद्र वाचविण्यासाठी समितीची बैठक