शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

जुने नाशिकला होणार योग्य दाबाने वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:49 AM

जुने नाशिकला वीजपुरवठा करणाऱ्या टाकळी उपकेंद्रातील जुने १० एमव्हीए रोहित्र नुकतेच बदलण्यात आल्याने जुने नाशिक परिसरात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

नाशिकरोड : जुने नाशिकलावीजपुरवठा करणाऱ्या टाकळी उपकेंद्रातील जुने १० एमव्हीए रोहित्र नुकतेच बदलण्यात आल्याने जुने नाशिक परिसरात योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.  जुन्या नाशिकमध्ये वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठ्याबाबत अनेक वर्षांपासून तक्रारी होत्या. जुन्या नाशकातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून टाकळी उपकेंद्रातील जुने झालेले १० एमव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र बदलून २१ लाख रुपये खर्च करून नवीन रोहित्र बसविण्यात आले. नवीन रोहित्राचे उद्घाटन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात येऊन नवीन रोहित्र कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे जुने नाशिक परिसरातील वीजपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होऊन अखंडित व पुरेशा दाबाने वीज मिळण्यास मदत होणार आहे.यावेळी नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता शुभांगी काटकधोंड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, नाशिक शहर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, अतिरिक्त कार्यकारी श्याम बोरसे, सहायक अभियंता विशाल निंबाळकर, वंदना पेठकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक