भद्रकाली पाेलीस ठाण्याजवळ असलेल्या भद्रकाली मंडईत सुमारे तीनशे विक्रेते आहेत. त्यात भाजीपाला, धान्य- किराणा तसेच मांस विक्रीची दुकाने आहेत. महापालिका या विक्रेत्यांकडून नियमित बाजार फी वसुल करते, मात्र असे असताना देखील गेल्या काही दिवसांत वीज बिल न भरल्याने महापालिकेला आठच दिवसात दुसऱ्यांचा वीज कपातीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. मंडईत दोन वीज मीटर असून एका मीटरवर एक लाख रूपयांची थकबाकी दिसत असल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडित केला हेाता. त्यावेळी महापालिकेने धावपळ केली आणि रक्कम भरून वीज पुरवठा सुरळीत केला. शुक्रवारी मात्र आता दुसऱ्या वीज मीटरवरून केला जाणारा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मीटरवरून घेतल्या गेेलेल्या रिडींगनुसार दीड लाख रूपयांची थकबाकी असल्याचे समजले. यामुळे विक्रेत्यांची मात्र अडचण झाली. मंडईच्या एका भागात वीज पुरवठा तर दुसऱ्या भागात अंधार असे चित्र होते. महापालिकेने नियमीत वीज बिल भरावे आणि अकारण विक्रेत्यांना त्रास हेाऊ देऊ नये अशी मागणी येथील विक्रेत्यांनी केला आहे.
कोट...
महापालिकेच्या वतीने वीज बिल नियमीतपणे भरले. परंतू काही काळाने बिल थकल्यानंतर महावितरणने पूर्वसूचना न देताच वीज कापली. प्रशासनाने सर्व माहिती घेतली असून लवकरच बिल अदा केले जाईल.
- स्वप्नील मुघलवाडकर, विभागीय अधिकारी, पूर्व विभाग
कोट...
महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही हे माहीत आहे. मात्र वीज बिलाचे दीड लाख रूपये सुध्दा भरण्याची ऐपत नसेल तर कठीण आहे. महावितरण आणि महापालिका दोन्ही निमशासकीय संस्थांच्या असमन्वयातून विक्रेते वेठीस धरले जात आहेत. हे थांबायला हवे.
- राजेंद्र बागुल, माजी नगरसेवक.