पिंपळगाव बसवंत : येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी सोमवार दि. २८ रोजी संपावर गेले आहेत. विद्युत विभागाकडून हेतुपुरस्सर विद्युत पुरवठा खंडित करून संप पुकारण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. विजेची बत्ती गूल झाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी वीज सुरू केली नाही; मात्र शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याने रात्री उशिराने वीज वीजपुरवठा सुरू करण्यात आला.पळगाव बसवंत येथील महावितरण कर्मचारी विविध मागण्यांसाठी सोमवारी संपावर गेले आहेत. संप आपल्या मागण्यासाठी जरूर केला पाहिजे; परंतु पिंपळगाव बसवंतसह अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित करून संपात कर्मचारी सहभागी झाले असल्याची बाब आश्चर्यकारक आहे. ही बाब लक्षात येताच पाच तासानंतर नागरिक, शेतकरी अखेर विद्युत वितरण विभागातील अधिकारी वर्गाला धारेवर धरत तब्बल विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी घेराव घातला, मात्र उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी वीज सुरू केली नाही, त्यामुळे रात्री आठपर्यंत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीवर ठिय्या दिला.यावेळी दिलीप मोरे, बाळासाहेब बनकर, सतीश मोरे, संदीप कागदे, सोमनाथ बनकर, संदीप झुटे आदीसह व्यापारी शेतकरी नागरिक उपस्थित होते.
पिंपळगावी आंदोलनानंतर वीजपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 10:13 PM
पिंपळगाव बसवंत : येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी सोमवार दि. २८ रोजी संपावर गेले आहेत. विद्युत विभागाकडून हेतुपुरस्सर विद्युत पुरवठा खंडित करून संप पुकारण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. विजेची बत्ती गूल झाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र तरीही कर्मचाऱ्यांनी वीज सुरू केली नाही; मात्र शेतकरी अधिकच आक्रमक झाल्याने रात्री उशिराने वीज वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
ठळक मुद्देशेतकाऱ्यांचा वीज कर्मचाऱ्यांविरोधात ठिय्या