शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
4
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
5
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
6
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
7
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
9
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
10
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
12
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
13
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
14
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
15
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
16
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
17
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
18
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
19
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
20
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट

देवळा तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:37 PM

लोहोणेर : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१६) दुपारी देवळा तालुक्यातील वासोळ येथे ...

ठळक मुद्देगु्न्हा दाखल : वासोळ येथील प्रकार

लोहोणेर : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१६) दुपारी देवळा तालुक्यातील वासोळ येथे मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे थकीत वीज बिलांची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसात नोंदविलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी दुपारी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख निकम व नितीन पवार हे तालुक्यातील वासोळ येथे रामदास सखाराम गवळी यांच्याकडे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेले होते. यावेळी वीजग्राहक गवळी यांनी वीज बिल भरण्यास नकार देऊन दोघा कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केली. निकम यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असता रामदास गवळी, अनिल गवळी, गोरख गवळी, घरातील इतर महिला व पुरुषांनी निकम यांच्यासह पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजCrime Newsगुन्हेगारी