सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावर गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीमेअंतर्गत प.पू.ओम दत्त श्री ठाकुर महाराज माध्यमिक विद्यालय सप्तशृंगगड व जिल्हा परिषद मराठी शाळेतली विद्यार्थी, विद्यार्थिनींनी,व आरोग्य सेवक, सेवीका, अगंणवाडी शिक्षक, व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी सपूंर्ण गावातून जनजागृती करत सर्व ग्रामस्थांना माहिती पत्रक वाटप करण्यात आले.९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांनी एमआरची लस टोचून घेणे बंधनकारक व महत्त्वाचे आहे. गोवर हा प्राणघातक रोग आहे. ज्याचा प्रसार विषाणू द्वारे होतो. गोवरमूळे विविध प्रकारची गूतांगूत होऊन बालकाचा अकाली मृत्यू होऊ शकतो, तसेच रूबेला हा संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रसार विषाणू मूळे होतो त्याची लक्षणे गोवरसारखीच असतात त्याचा संसर्ग मूले आण िमूली दोघांनाही होतो तथापि गर्भवती महीलेला गर्भावस्थेच्या सूरूवातीच्या काळात रूबेला चा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम सीआरएस मध्ये जन्म जात रूबेला सिड्रोम होऊ शकतो ज्याचे परिणाम गर्भासाठी आणि नवजात शिशूसाठी घातक ठरू शकतात अशी माहिती यावेळी आरोग्य सेवक पाटील यांनी दिली. यावेळी उपसरपंच राजेश गवळी, व ग्रामस्थ उपस्थित होते.