नाशिक : फ्रान्समध्ये आयोजित जागतिक आर्ट फेस्टिव्हलमध्ये नाशिकचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना सर्वोत्तम चित्रकार म्हणून प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. पाचशे युरो आणि प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.फ्रान्समधील जागतिक आर्ट फेस्टिव्हलमध्ये १५ देशांतील निवडक ५५ चित्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते. भारतातून प्रफुल्ल सावंत या एकमेव चित्रकाराची निवड करण्यात आली होती. फेस्टिव्हलमध्ये ५५ चित्रकारांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती.चित्रकारांच्या वैविध्यपूर्ण चित्रशैली, जलरंगात विषय मांडण्याची चित्रकारांची प्रयोगशीलता, चित्ररसिकांचा प्रतिसाद, चित्रांची कलात्मक उंची व चित्रकारांचे आजवरचे जागतिक पातळीवरील योगदान आदी निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात आले. त्यात प्रफुल्ल सावंत यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सावंत यांनी प्रदर्शनात इटली, चायना यांसह भारतातील जोधपूरसह नाशिकच्या सौंदर्यस्थळांवर आधारित निसर्ग चित्रांचा समावेश केला होता.
फ्रान्समध्ये आयोजित जागतिक आर्ट फेस्टिव्हलमध्ये प्रफुल्ल सावंत यांना पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:32 AM
फ्रान्समध्ये आयोजित जागतिक आर्ट फेस्टिव्हलमध्ये नाशिकचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना सर्वोत्तम चित्रकार म्हणून प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.
ठळक मुद्दे पाचशे युरो आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप १५ देशांतील निवडक ५५ चित्रकार निमंत्रित जागतिक पातळीवरील योगदान आदी निकषा