चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत प्लॅस्टिकमुक्ती व प्लॅस्टिकबंदी या महत्त्वपूर्ण विषयावर ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपसरपंच मनोज शिंदे होते. या अभियानांतर्गत गावातून अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी व स्वच्छता फेरी काढली. तर गावातील ग्रामस्थांना अभियानाचे निकष सांगण्यात आले. प्लॅस्टिकबंदी संदर्भात घरोघरी जाऊन नोटीस देणे, भित्तिपत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली. सर्व व्यापारी, दुकानदार यांना प्लॅस्टिकबंदीचे आवाहन करण्यात आले. गावातील व परिसरातील सर्व प्लॅस्टिक गोळा करून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्थांना स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या अॅपबाबत माहिती देऊन मते नोंदवून घेण्यात आली. ओल्या व सुक्या कचऱ्याबाबत माहिती दिली. सर्वांनी स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्याचा संकल्प केला. यावेळी संपर्क अधिकारी तथा सहायक गटविकास अधिकारी एम.एन. पाटील, सरपंच सखुबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, ग्रामसेवक भागवत सोनवणे, कैलास शिंदे, दीपक जाधव, जगन यशवंते, नंदराज जाधव, जगन जाधव, भास्कर कापडणे, मुख्याध्यापक दादा पाटील, खैरनार, श्रीमती जगताप, सूर्यवंशी, आरोग्य सेवक कुंभार्डे, सावंत, अंगणवाडी सेविका भागाबाई पिंपळसे, नीलेश कापडणे, काळू कापडणे, हर्षल कापडणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
राजदेरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 6:09 PM