सिन्नर : पेट्रोल, गॅस, डिझेल व जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने महागाई विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बसस्थ्लृानकाजवळ भिक मांगो आंदोलन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘पेट्रोल, गॅस, किराणाचे भाव गगनाला-भीक लागले शासनाला’, एक दोन रुपये धर्माला, कमी नाही होणार कमाईला’, ‘महागाई भिडली गगनाला-भीक लागले शासनाला’ घोेषणा देण्यात आल्या.
पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरी गाठत आहेत. तसेच घरगुती गॅसचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या महागाईचा परिणाम ट्रान्सपोर्टच्या दरवाढीत झाला आहे. घर बांधकाम साहित्याचे दर भरमसाट वाढले आहेत. अन्न, वस्र, निवारा बरोबर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने गोरगरिबांचे जगणे अवघड झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आंदोलनात दौलत धनगर, संदीप लोंढे, सुनील महाराज, बापू सानप, अर्जुन घोरपडे, गणपत नाठे, नितीन पवार, कृष्णा लहाने, सुनील गर्जे, सूरज सानप, शिवाजी गुंजाळ, भास्कर उगले, गीता पानसरे, हिरामण माळी, पंकज पेटारे, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - ०५ प्रहार आंदोलन
सिन्नर येथे भीक मांगो आंदोलनात सहभागी झालेले प्रहारचे कार्यकर्ते.
===Photopath===
050221\05nsk_31_05022021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ प्रहार आंदोलन सिन्नर येथे भीक मांगो आंदोलनात सहभागी झालेले प्रहारचे कार्यकर्ते.