लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : धन्य है भाग्य हमारे जो ये दिन देख पाए है।लहरा दो भगवा घरघर पर; मेरे राम अपने घर आए है।।अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने चैतन्य बहरलेल्या नाशिकनगरीत रामभक्तांनी एकमेकांना सोशल मीडिीयावर शुभेच्छा देत राममंदिंर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद व्यक्त केला.रामभक्तांनी आपल्या भ्रमणध्वनीवर श्रीरामाचे छायाचित्र डिपी म्हणूनदेखील ठेवले होते. श्रीराम गुणगान गाणाऱ्या भजनांच्या तसेच गीतांच्या ओळींच्या अधाराने भाविकांनी आपल्या भावना व्यक्त करीत आनंद व्यक्त केला. भूमिपूजन सोहळ्याचा आनंद व्यक्त करताना रामभक्तांनी संयम राखत आपल्या भावना व्यक्त केल्या. रघुकुल रित सदाचली आई।प्राण जाई पर वचन न जाई।।अशा शब्दात भूमिपूजन सोहळ्याची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. कोरोनाचे संकट आणि मंदिरे बंद असल्याने भक्तांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्यावर अधिक भर दिला. मोबाइलवर प्रोफाइल पिक्चर तसेच वॉलपेपर तयार करून भाविकांनी शुभेच्छासंदेश पाठविले. भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठीदेखील एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आठवण करून देण्यात आली. श्रीरामाच्या छबी मोबाइलवरझळकत होत्या.
सोशल मीडियावर श्रीरामाचे गुणगान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:43 IST
नाशिक : धन्य है भाग्य हमारे जो ये दिन देख पाए है। लहरा दो भगवा घरघर पर; मेरे राम अपने घर आए है।। अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने चैतन्य बहरलेल्या नाशिकनगरीत रामभक्तांनी एकमेकांना सोशल मीडिीयावर शुभेच्छा देत राममंदिंर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद व्यक्त केला.
सोशल मीडियावर श्रीरामाचे गुणगान
ठळक मुद्देशुभेच्छा वर्षाव : अनेकांनी मोबाईलवर ठेवला प्रभू श्रीरामचंद्राचा आयकॉन