मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी गुणवंत यादीत आपले नाव कायम राखले आहे. मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत एकूण बारा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आली असून, समीर विकास ठाकरे यांनी इयत्ता तिसरीत सेंटर रँकमध्ये प्रथम क्रमांक तर भूषण दादा पानसरे याने इयत्ता सातवीच्या सेंटर रँकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुणाल भाऊसाहेब पानसरे इयत्ता सातवी द्वितीय, साईराज विनोद आहिरे व धनश्री राजाराम नाडेकर संयुक्त रीत्या चौथे, कल्पेश योगेश चौरे व कावेरी चव्हाण पाचवे, दीक्षा सोनवणे सहावी, देवांश कोठावदे सातवा, देवेंद्र खैरनार आठवा, कल्याणी पवार हिने दहावा तर सुशील पवार याने सेंटर रँकमध्ये अकरावा क्रमांक फडकावला आहे. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, किरण सोनवणे, शेखर अहिरे, ज्ञानेश्वर सोळुंके, अमोल गातवे, स्वाती दातरे, सारिका शिंदे, विशाखा सोनवणे, हर्षाली मोरे, पवन नाडेकर, सुजाता पाटील, रोहिणी सोनवणे, निर्मला रौंदळ, जागृती नहिरे, आदींसह शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेखर आहिरे यांनी सूत्रसंचालन केले तर गोकुळ दात्रे यांनी आभार मानले. (३१ सटाणा १)
310721\443231nsk_12_31072021_13.jpg
३१ सटाणा १