पेठ -आदिवासी भागातील दऱ्याखो-यात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाची आस धरणाºया होतकरू विद्यार्थ्यांना अगदी छोटीशी मदत मिळाली तरी त्या संधीचे सोनं करण्याची ताकद त्यांच्यात आहे हे नुकत्याच जाहीर झालेल्या पुर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावरून सिद्ध झाले आहे. धुळे येथील आदिवासी विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी मागील वर्षी पेठ तालुक्यातील सहा बीटातील सहा शाळांना शिष्यवृती परीक्षेच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक संच भेट दिले. या संचाचा शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घेऊन कसोसीने अभ्यास केला. त्याचा परिपाक म्हणून या वर्षीच्या निकालात पेठ तालुक्यातील तब्बल ८१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्रात विद्यानिकेतन शाळांची निर्मिती करण्यात आली. पुर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना या विद्यालयात प्रवेश दिला जातो. विद्यानिकेतन शाळांच्या प्रवेशात वाढ व्हावी व आदिवासी मुलांना एक चांगले शैक्षणकि व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी धुळे येथील आदिवासी विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यानिकेतन गिव्ह बॅक फॉडेशन स्थापन केली. वेगवेगळ्या विभागात नोकरी व व्यावसायाच्या निमित्ताने स्थिरस्थावर झालेल्या या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकी जपत वर्गणी करून शिष्यवृत्ती परिक्षांचे मार्गदर्शक पुस्तकांचे संच खरेदी केले. नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील निवडक शाळांना प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते संचाचे वाटप करण्यात आले. शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा बौध्दीक खुराक हाती लागल्यावर त्यांचा उत्साह वाढला आणी तनमनाने अध्ययन व अध्यापन करून आदिवासी विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. नुकताच या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये पेठ तालुक्यातील तब्बल ८१ मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. त्यापैकी विद्याथ्र्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येण्याचा विक्र म केला. याकामी फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, समन्वयक रामदास शिंदे,सदस्य जयदिप गायकवाड, राहुल गाडगीळ आदींचे सहकार्य लाभले.----------------------मोहपाडा शाळेचे ११ विद्यार्थीजिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहपाडा येथील ११ विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शक संचाच्या मदतीने गुणवत्ता यादीत झेप घेतली. मुख्याध्यापक भास्कर जाधव, जयदिप गायकवाड, रविंद्र खंबाईत, गवळी, निर्मला सातपुते, रेणूका गवळी आदींचे मार्गदर्शन लाभले.
माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानज्योतीने आदिवासी बालकांच्या जीवनात प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:22 PM