शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

प्रताप दिघावकरांनी अल्पावधीतच जिंकली शेतकऱ्यांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 1:43 AM

नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल विकत घेत त्याची व्यवहारानुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना ‘खाकी’ने प्रथमच जोरदार हादरा दिला. नाशिक परिक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात सुमारे साडेअकरा कोटींची रक्कम वसूल करण्यास पोलीस यंत्रणेला यश आले. यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली नाशिकचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी.  दिघावकर हे आपल्या प्रदीर्घ पोलीस सेवेतून शुक्रवारी (दि.३0) निवृत्त झाले. स्वतः शेतकरी असलेले दिघावकर हे काही महिन्यांतच शेतकऱ्यांचे ‘हीरो’ बनले.

ठळक मुद्देसेवेतून निवृत्त : बुडीत निघालेल्या ११ कोटींची वसुली करण्यात यश; गुटखामुक्तीसाठीही  प्रयत्न

नाशिक : नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल विकत घेत त्याची व्यवहारानुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना ‘खाकी’ने प्रथमच जोरदार हादरा दिला. नाशिक परिक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात सुमारे साडेअकरा कोटींची रक्कम वसूल करण्यास पोलीस यंत्रणेला यश आले. यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली नाशिकचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी. दिघावकर हे आपल्या प्रदीर्घ पोलीस सेवेतून शुक्रवारी (दि.३0) निवृत्त झाले. स्वतः शेतकरी असलेले दिघावकर हे काही महिन्यांतच शेतकऱ्यांचे ‘हीरो’ बनले. दिघावकर यांनी सप्टेंबर २०२० साली नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची सूत्रे तत्कालीन आयपीएस अधिकारी छेरिंग दोरजे यांच्याकडून स्वीकारली.यानंतर त्यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शेतकरी फसवणूक प्रकरणावर भर देणार असल्याचे म्हटले आणि फसवणूक करून पोबारा केलेल्या ‘त्या’ व्यापाऱ्यांना रोखठोक इशारा दिला. यामुळे व्यापाऱ्याचे धाबे दणाणले. शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज तालुका पातळीवरील पोलीस ठाण्यांमधील फायलींत धूळखात पडून होते, त्या सर्व अर्जांवरील धूळ झटकली गेली.नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्वच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्यांचे फसवणुकीच्या बाबतीत प्राप्त झालेल्या अर्जांची युद्धपातळीवर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. परिणामी, सप्टेंबरपासून डिसेंबरअखेरपर्यंत एकूण पाच जिल्ह्यांतून १ हजार १९२ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे गाऱ्हाणे अर्जातून मांडले. यापैकी १ हजार १६१ अर्ज केवळ नाशिक ग्रामीणमधून आले आहेत. फसवणुकीची एकूण रक्कम ४६ कोटी २० लाख ५२ हजार ४३६ च्या घरात पोहोचली. १९१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले. २०० व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये तडजोड होऊन १९९ व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ६ कोटी ७५ लाख ८८ हजार ९८ रुपयांची रक्कम परत केली आहे. सुशिक्षित बेरोजगारांनाही दिला दिलासासुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार उत्तर महाराष्ट्रातील ३९ सुशिक्षित बेरोजगारांनी केली होती. या तक्रारींनुसार त्यांची २ कोटी ३८ लाख ९० हजार १०० रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी २ तक्रारदार व फसवणूक करणाऱ्यांमध्ये तडजोड झाली आहे, तसेच ११ जणांनी ३७ लाख ३८ हजार रुपये परत केले, तर फसवणूक करणाऱ्यांनी १५ लाख ५७ हजार रुपये परत करण्याची तयारी दर्शवली आहे, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेरोजगारांना गंडा घातल्याप्रकरणी सर्वाधिक तक्रारी नाशिक ग्रामीण भागातील असून, येथील २२ तक्रारींनुसार त्यांना १ कोटी ४४ लाख ४१ हजार १०० रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. दिघावकर मूळ नाशिककरदिघावकर हे मूळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र आहे. १९८७ च्या राज्यसेवा आयोगाच्या बॅचचे ते अधिकारी आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदे, गुटख्याची तस्करी, शस्त्रांची तस्करी जुगाराचे अड्डे, दारूच्या भट्ट्या नाशिक परिक्षेत्र अर्थात उत्तर महाराष्ट्रातून उद्‌ध्वस्त करण्याचे आदेश त्यांनी सूत्रे हाती घेताच दिले. गुटखामुक्त उत्तर महाराष्ट्र हे अभियानही ग्रामीण पोलिसांचे गाजले.

कृतज्ञतेपोटी होर्डिंग झळकावलेनलहोर्डिंग, जाहिरात फलक, कटआऊट म्हटलं की एखादा पुढारी समोर येतो. राजकीय व्यक्ती आणि होर्डिंग्ज यांचे जुने समीकरण आहे. मात्र, जेव्हा एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याचे खाकी वर्दीवरील सचित्र असलेले भले मोठे होर्डिंग शहरातील मुख्य चौकात झळकले आणि हा विषय अधिकच चर्चेचा बनला होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा असाच भला मोठा फलकाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते. एका शेतकारीपुत्राने निनावी हे कृतज्ञतापूर्वक होर्डिंग्ज लावले होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसFarmerशेतकरी