नायगाव : हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत जोगलटेंभी (ता.सिन्नर) येथील प्रतिक ताठे याने सुवर्णपदक मिळविले, तर निफाड तालुक्यातील चौघांनी ब्रांझ व रौप्यपदकाची कमाई करत नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे.युथ गेम नॅशनल चॅम्पियनशिप २०२१ (ओपन) हरियाणा, सोनिपत येथे दि. २४ ते २६ रोजी देश पातळीवर पार पडलेल्या या अॅथलेटिक्स प्रकारांमधील रनिंग या प्रकारात महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. प्रतीक प्रभाकर ताठे (जोगलटेंभी. सिन्नर), रवी मोरे (शिरसगाव. निफाड), संकेत डेर्ले (शिंगवे, ता. निफाड), उमेश शिंदे (बेरवाडी. ता. निफाड), वैष्णव मोगरे (वडाळीनजीक, ता. निफाड) या खेळाडूंना महाराष्ट्रातील प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.या स्पर्धेत ज्युनियर ग्रुपमध्ये जोगलटेंभी येथील प्रतीक ताठे याने १५०० मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक मिळवून नाशिकसह महाराष्ट्रातील शिरपेचात नवीन तुरा रोवला आहे. तसेच ज्युनियर प्रकारात रवी मोरे (२०० मीटर) ला ब्राँझ पदक, ८०० मीटरमध्ये (ज्युनियर स्पर्धेत) संकेत डेर्ले याने रौप्यपदक, १५०० मीटर (सीनिअर स्पर्धेत) उमेश शिंदे या खेळाडूला ब्राँझ पदक मिळविण्यात यश आले आहे, तर ८०० मीटर धावण्याच्या (सीनिअर स्पर्धेत) वैष्णव मोगरे या खेळाडूने रौप्य पदक मिळवून यश संपादन केले आहे.
राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत प्रतीक ताठेला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 8:42 PM
नायगाव : हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अथलेटिक्सस्पर्धेत जोगलटेंभी (ता.सिन्नर) येथील प्रतिक ताठे याने सुवर्णपदक मिळविले, तर निफाड तालुक्यातील चौघांनी ब्रांझ व रौप्यपदकाची कमाई करत नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे.
ठळक मुद्देअॅथलेटिक्स प्रकारांमधील रनिंग या प्रकारात महाराष्ट्रातील पाच खेळाडूंनी ही कामगिरी केली